इच्छुक उमेदवारांच्या वंचित बहुजन आघाडी घेणार आजपासून मुलाखती

लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आता राज्यात निवडणुकांची तयारी केली जात आहे. पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यातील पक्षांमध्ये हालचाली सुरू आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने विधानसभेसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेणार असल्याचे वृत्त आहे. 288 जागांसाठी इच्छुक उमेदवारांना बोलवले असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वाढली आहे.

288 जागांची तयारी करत असलेल्या वंचित आघाडीमुळे काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर 15 तारखेला पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती देणार आहेत. काँग्रेसला याअगोदर वंचितने 40 जागांची ऑफर देऊ केली होती. यामुळे आघाडीत येण्याबाबतचे स्पष्ट संकेत वंचित आघाडीने या अगोदरच दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.