InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

भाजपकडून मिळालेल्या आर्थिक मलिद्यावर वंचित बहुजन आघाडीचा डल्ला- राष्ट्रवादी

शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह दोन्ही कॉंग्रेसमधील नेते मोटारीतून फिरतात. वंचित आघाडीचे नेते मात्र हेलिकॉप्टरने फिरतात. हेलिकॉप्टरने फिरणारे वंचित कसे? असा सवाल राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केला.

इव्हीएममध्ये हस्तक्षेप होत असल्याचे सांगून वंचित बहुजन आघाडीने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीच्या माध्यमातून कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्‍वास कमी करण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडी करत असल्याचे आरोप ही त्यांनी विचारला.

प्रदेशाध्यक्ष शेख व कार्याध्यक्ष रविकांत वर्पे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. शहर व जिल्हा राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाऱ्यांची त्यांनी आज आढावा बैठक घेतली. या बैठकीला शहराध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर, जिल्हाध्यक्ष विक्रांत माने आदी उपस्थित होते.

भाजपकडून मिळालेल्या आर्थिक मलिद्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते डल्ला मारत असल्याचा आरोपही प्रदेशाध्यक्ष शेख यांनी केला.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply