InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘अमावस’ या चित्रपटाचे टीझर प्रदर्शित….

रागिनी एमएमएस २’, ‘अलोन’ आणि ‘१९२० एविल रिटर्न्स’ यांसारख्या भयपटांचे दिग्दर्शक भूषण पटेल आणखी एक भटपय प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.

‘अमावस’ असं या चित्रपटाचं नाव असून हॅलोविनला त्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता या भयपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये नरगिस फाख्री, सचिन जोशी, विवान भटेना, नवनीत कौर ढिल्लन, मोना सिंग आणि अली असगर यांच्या भूमिका आहेत.

‘इसबार भी वो अंधेरा छाएगा अपनी पुरी ताकदों के साथ,’ असे काही संवाद या टीझरमध्ये आहेत. अमावस्येच्या रात्रीची ही कथा आहे आणि हा टीझर तुमच्याही काळजाचा ठोका चुकवेल. या भयपटाची संपूर्ण शूटिंग लंडनमध्ये ४० दिवसांत झाली. ११ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.