महाविकास आघाडीत नाराजीचा सुर; शिवसेना मंत्र्याचे राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

सातारा : राज्यात सध्या जिल्हा बँकांच्या निवडणुकीचं वातावरण तापलं आहे. जिल्हा बॅंकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांकडून मला आपण एकत्रित निवडणूक लढवायची आहे, असे निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सांगितले जात होते. मात्र, तीन पक्षात एकमेकांविषयी नाराजीचे सुर उमटले आहेत. आता राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रावादी विषयी नाराजीचा सुर आळवला आहे.

शंभूराज देसाई म्हणले कि, राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकाही राज्यस्तरीय नेत्याचा, जिल्ह्यातील नेत्यांचा कोणाचाच संपर्क झाला नाही. शिवसेनेला एकाकी पाडायचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून होत असेल, तर आम्ही पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांना सांगून लोकशाही मार्गानं शिवसेनेच्या वतीनं आम्ही यापुढे स्वतंत्र निवडणुका लढवू. असं शंभूराज देसाई म्हणाले आहेत.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकांवरून शंभुराज देसाई यांनी संताप व्यक्त केला आहे. कोणाच्या मदतीने कोणाचा विजय होतो तर कोणाचा पराभव होतो. प्रत्येकवेळी राजकारण मात्र वेगळ असतं. मी माझा पराभव खिलाडू वृत्तीने स्वीकारत आहे, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. 102 मतांच्या निवडणुकीला पराभव असं म्हणता येणार नाही, असंही शंभूराज देसाई म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा