Diwali 2022 | दिवाळी दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा ‘या’ गोष्टी

टीम महाराष्ट्र देशा: 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी देशात सर्वत्र दिवाळी Diwali मोठ्या थाटामाटात साजरी केली जाणार आहे. हा सण कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरा केला जात असून देशात सगळीकडे दीपोत्सव साजरा केला जातो. भगवान श्रीरामाच्या आगमनाच्या स्मरणार्थ हा सण देशभर साजरा केला जातो. दिवाळी हा सण प्रकाशाने अंधारावर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी माता लक्ष्मी आपल्या भक्तांच्या घरात वास्तव्य करण्यास येते अशीही मान्यता आहे. त्यामुळे प्रत्येक जण दिवाळी दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करतो. दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भारतात माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करून सुख समृद्धीची प्रार्थना केली जाते. त्याचबरोबर वेगवेगळे पद्धती वापरून माता लक्ष्मीच्या स्वागताची तयारीही केली जाते. आज आम्ही तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी काय करता येईल याबद्दल माहिती सांगणार आहोत.

दिवाळी दिवशी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी पुढील गोष्टी करा

घराच्या मुख्य द्वारावर स्वस्तिक काढा

स्वस्तिक हे चिन्ह हिंदू धर्मात अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जाते. त्यामुळे माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी घराच्या मुख्य द्वारापाशी स्वस्तिक काढल्यास माता लक्ष्मी अधिक प्रसन्न होते. त्याबरोबर घरात सुख-समृद्धीचाही वास होतो.

माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी बनावटी फुलांऐवजी खरी फुले वापरा

दिवाळी असो किंवा इतर कुठलीही पूजा त्यामध्ये फुलांना सर्वात जास्त महत्त्व असते. कारण पूजेमध्ये फुले वापरल्यास पूजा अधिक प्रसन्न वाटू लागते. त्यामुळे माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी खोट्या फुलांचा वापर न करता खरी फुले वापरा. फुलांचा सुगंध घरामध्ये सर्वत्र सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो.

घराच्या मुख्य द्वारापाशी माता लक्ष्मीची पावले काढा

दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर लक्ष्मीची पावले काढू शकतात. यामुळे आपल्यावर येणारी संकटे दूर होऊन माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव आपल्या सोबत राहतो.

माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला तोरण बांधा

दिवाळी दिवशी देवी लक्ष्मीची स्वागत करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानाचे किंवा फुलांचे तोरण लावा. तोरण लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन घर अधिक प्रसन्न होते. त्याचबरोबर माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते.

टीप : वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.