Diwali 2022 | दिवाळी लक्ष्मी पूजा झाल्यानंतर रात्रभर दिवा का लावावा? जाणून घ्या

टीम महाराष्ट्र देशा: 24 ऑक्टोबर 2022 रोजी देशात सर्वत्र दिवाळी (Diwali) साजरी केली जाणार आहे. तत्पूर्वी 22 ऑक्टोबर 2022 रोजी धनत्रयोदशी साजरी करण्यात येणार असून सगळीकडे दीपोत्सवाची सुरुवात होणार आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी पासूनच कुबेर आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दररोज संध्याकाळी घरात आणि घराच्या आजूबाजूला दिवे लावले जातात. त्याचबरोबर दिवाळीच्या पाचही दिवशी सगळीकडे दीपोत्सव साजरा केला जातो.

कार्तिक अमावस्या दिवशी म्हणजेच 24 ऑक्टोबर 2022 रोजी भारतात सगळीकडे लक्ष्मीपूजन करण्यात येणार आहे. लक्ष्मीपूजन हा दिवाळी सणातील मुख्य दिवस मानला जातो. या दिवशी देवी लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा केली जाते. कारण जिथे प्रकाश आणि स्वच्छतेचा वास होतो तिथे माता लक्ष्मी प्रसन्न होती अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी घराचा एकही कोपरा अंधारात नसावा असेही म्हणले जाते. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या कानाकोपऱ्यात आणि आजूबाजूचा परिसर दिवे लावून प्रकाशित केला जातो.

यावर्षी दिवाळी (Diwali) लक्ष्मी पूजेचा मुहूर्त

यावर्षी 24 ऑक्टोबर 2022 रोजी देशात दिवाळी लक्ष्मीपूजन केले जाणार आहे. 24 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 07.02 ते 08.23 पर्यंत, प्रदोष काल म्हणजेच संध्याकाळी लक्ष्मीपूजन करण्यासाठी सर्वोत्तम मुहूर्त आहे. त्याचबरोबर यावर्षी निशिता मुहूर्त 24 ऑक्टोबर 2022 रोजी 11.46 ते 12.37 पर्यंत असेल. निशिता मुहूर्त म्हणजे मध्यरात्रीचा मुहूर्त ज्यामध्ये मध्यरात्री देवी लक्ष्मीची आराधना करून तिला प्रसन्न केले जाते.

दिवाळीच्या दिवशी संपूर्ण रात्रभर दिवा का तेवत ठेवावा?

दिवाळीच्या दिवशी देवासमोर त्याचबरोबर आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात दिवे लावण्याची प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे. देवी लक्ष्मीची पूजा केल्यानंतर तिच्यासमोर रात्रभर दिवा तेवत ठेवण्याची परंपरा देखील भारतात फार पूर्वीपासून सुरू आहे. ज्या घरात प्रकाश आणि स्वच्छता असते त्या घरात माता लक्ष्मी प्रसन्न होते अशी मान्यता आहे. त्यामुळे रात्रभर माता लक्ष्मी समोर दिवा लावून ठेवला जातो. ज्या घरात प्रकाश आहे त्या घरातून माता लक्ष्मी कधीच बाहेर पडत नाही आणि त्या व्यक्तीला धन, कीर्ती, वैभव आणि आरोग्य प्राप्त होते असे देखील मानले जाते. दिवाळीच्या दिवशी रात्रभर दिवा लावून काजळ ही बनवले जाते. ते काजळ दुसऱ्या दिवशी घरातील सदस्यांच्या डोळ्याला लावले जाते. त्याचबरोबर हे काजळ घरातील धन, कपाट, तिजोरी इत्यादी गोष्टींनाही लावले जाते. असे केल्याने अडथळे दूर होऊन घर समृद्ध होते असे मानले जाते.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.