Diwali 2022 | यावर्षी कधी साजरी करावी भाऊबीज, जाणून घ्या तारीख अन् मुहूर्त
टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये सध्या सर्वत्र सणासुदीचे वातावरण तयार झालेले आहे. सगळीकडे दिवाळीची लगबग सुरू झालेली असून खरेदी विक्रीचा जोर देशातील बाजारपेठत वाढला आहे. दिवाळी हा सण भारतामध्ये साधारणता चार दिवस साजरा करतात. धनत्रयोदशीच्या दिवशी पासून दिवाळीला सुरुवात होते. तर भाऊबीजेच्या दिवशी दिवाळी संपते. दिवाळी सणातील भाऊबीज या सणाला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण रक्षाबंधन प्रमाणेच भाऊबीज हा सण बहिण भावातील प्रेमाच्या स्नेहाचे प्रतीक मानला जातो. भाऊबीजेच्या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळून त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात. प्राचीन काळापासून भाऊबीज साजरी करण्याची प्रथा भारतात सुरू आहे.
भाऊबीज मुहूर्त 2022
सध्या देशात सगळीकडे दिवाळीची धूम सुरू आहे. पंचांगानुसार, यावर्षी दिवाळी 24 ऑक्टोबर 2022 रोजी साजरी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या दिवाळीतील भाऊबीज कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाची दुसरी तारीख म्हणजेच 26 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 2.42 वाजता सुरू होणार असून ती 27 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 12.45 वाजता समाप्त होईल. त्याचबरोबर यावर्षी भाऊबीजेला भावाला ओवाळण्यासाठी 12.14 ते 12.47 पर्यंतचा शुभमुहूर्त आहे. या कालावधीत बहिणीने भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात.
भाऊबीज विधी
भाऊबीजेच्या दिवशी बहिण भाऊ दोघेही ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून तयार होऊन देवाची पूजा करतात. यानंतर शुभ मुहूर्ताच्या वेळी बहिण भावाला ओवाळते. या ओवाळणी तबकामध्ये कुंकू,अक्षता, फुले, मिठाई, सुपारी इत्यादी गोष्टी आवश्यक ठेवणे असते. मुहूर्ताच्या वेळी बहिणी आपल्या भावाला कुंकाचा टिळा लावून त्यांना ओवाळतात.
धनत्रयोदशी 2022
पंचगंगा नुसार धनत्रयोदशी कार्तिक महिन्यातील त्रयोदशी तिथी 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 06.02 वाजता सुरू होत आहे. तर, 23 ऑक्टोबर 2022 रोजी म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्रयदिवशी तिथे संध्याकाळी 06.03 वाजता समाप्त होणार आहे. पुरातन काळापासून धनत्रयोदशीची पूजा प्रदोष काळातच केली जाते आणि त्रियोदशीची तिथी 23 ऑक्टोबरला संपते तेव्हाच प्रदोष कालावधी सुरू होते. म्हणूनच यावर्षी 22 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- T20 World Cup। रोहित शर्माचा तो फोटो पाहून चाहते संतापले; म्हणाले विराट रोहित पेक्षा चांगला कॅप्टन
- Kisi ka Bhai kisi ki Jaan | सलमान खानच्या ‘किसी की भाई किसी की जान’ चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर
- MNS | “मुख्यमंत्री राज ठाकरे…”, मनसे नेत्याचं ‘ते’ ट्विट होतय व्हायरल
- Shivsena । “संसदेत ‘गोडसे’ शब्द असंसदीय ठरवला तसा ‘शिंदे’…”; शिवसेनेचा हल्लाबोल
- Aditya Thackeray | “आतापर्यंत जे राजकराण झालं त्याला पातळी होती, पण…”; आदित्य ठाकरेंचा बावनकुळेंवर हल्ला
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.