Diwali Cleaning Tips | दिवाळीनिमित्त स्वयंपाकघरातील उपकरणे साफ करायचा विचार असाल, तर ‘या’ टीप्स करा फॉलो

Diwali Cleaning Tips । टीम महाराष्ट्र देशा: सध्या देशात सगळीकडे सणासुदीची धूम सुरू आहे. त्यामुळे सगळीकडे दिवाळीची साफसफाई देखील सुरू झाली आहे. प्रत्येकाने आपले घर आजूबाजूचा परिसर आणि घरातील इतर गोष्टीची साफसफाई सुरू केली आहे. कारण दिवाळीला घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ आणि साफ केला जातो. यामध्ये बहुतेक वेळा स्वयंपाक घर स्वच्छ करण्यासाठी जास्त वेळ आणि मेहनत लागते. कारण किचनमध्ये फ्रिज पासून मायक्रोवेव्हव पर्यंत अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांची साफसफाई करणे खूप कठीण आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून स्वयंपाक घरातील ही उपकरणे कशी साफ करायची याबद्दल माहिती सांगणार आहोत. या टिप्स द्वारे तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरातली ही उपकरणे मिनिटात स्वच्छ करू शकतात.

पुढील प्रमाणे स्वयंपाकघरातील मधील उपकरणे स्वच्छ करा

मायक्रोवेव्हव

मायक्रोवेव्हव हे स्वयंपाक घरात वापरलेल्या सर्वात जास्त उपकरणांपैकी एक आहे. सतत वापरामुळे मायक्रोवेव्हचा अनेक वेळा वास येऊ लागतो. त्यामुळे मायक्रोवेव्ह वेळोवेळी स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे. मायक्रोवेव्ह स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबाचा वापर करू शकता. यासाठी तुम्ही एका भांड्यात पाणी घेऊन त्यात अर्धा लिंबाचा रस पिळून ते भांडे मायक्रोवेव्हव मध्ये ठेवा. त्यानंतर मायक्रोवेव्हची क्लिनिंग बटन दाबून मायक्रो चालू करा. थोड्यावेळाने मायक्रोवेव्हव बंद करून मायक्रोवेव्हला आतून स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. यानंतर तुमचा मायक्रोवेव्ह पूर्णपणे स्वच्छ होऊन चमकू लागेल.

गॅस

स्वयंपाक घरातील गॅस हे सर्वात जास्त वापरले जाणारे उपकरण आहे. गॅस आपण रोज साफ केला तरच तो स्वच्छ राहू शकतो. गॅस स्वच्छ करायचा असेल तर लिक्विड सोप आणि बेकिंग सोडा मिक्स करून स्पंजच्या मदतीने ते गॅसवर पसरा. नंतर चार-पाच मिनिटे ते तसेच ठेवून स्वच्छ कपड्याने पुसा. यानंतर तुमचा गॅस नव्या सारखा चमकायला लागेल.

फ्रिज

स्वयंपाक घरामध्ये फ्रिजच्या सर्वाधिक वापर केला जातो त्यामुळे फ्रिज स्वच्छ राहणे हे नेहमी आवश्यक असते. तुम्हाला जर तुमच्या फ्रिजची खोलवर साफसफाई करायची असेल तर त्यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस वापरा. किंवा तुम्ही एका भांड्यात थोडे कोमट पाणी घेऊन त्यामध्ये विम जेल आणि वाईट विनेगर घालून देखील फ्रिज  साफ करू शकता. एम एक्स केलेल्या गोष्टी एका स्प्रे बॉटलमध्ये भरून तुम्ही फ्रिज स्वच्छ करू शकता. असे केल्यानंतर तुमचे फ्रिज चमकू लागेल आणि फ्रीजच्या वासही दूर होईल.

मिक्सर

मिक्सर हे साफसफाईच्या दृष्टीने स्वयंपाक घरातील सगळ्यात अवघड उपकरण आहे. तुम्ही व्हिनेगर च्या मदतीने मिक्सर साफ करू शकता. यासाठी तुम्हाला 2 चमचा व्हिनेगर मध्ये पाण्यामध्ये मिसळून मिक्सरला साफ करा. मिक्सरला अधिक चमकवण्यासाठी तुम्ही बेकिंग पावडर आणि पाण्याची पेस्ट बनवून देखील मिक्सर साफ करू शकता.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.