Diwali Cleaning Tips | दिवाळीसाठी घरातील पडदे साफ करण्यासाठी येत आहे प्रॉब्लेम? तर ‘या’ टीप्स करा फॉलो

टीम महाराष्ट्र देशा: सध्या देशात सगळीकडे दिवाळीची धूम सुरू आहे. त्यामुळे सगळीकडे दिवाळीची साफसफाई देखील सुरू झाली आहे. प्रत्येकाने आपले घर आजूबाजूचा परिसर आणि घरातील इतर गोष्टीची साफसफाई सुरू केली आहे. कारण दिवाळीला घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ आणि साफ केला जातो. यामध्ये विशेषता घरांच्या पडद्याची सफाई दिवाळीलाच केली जाते. कारण घरातील पडदे साफ करणे हे मोठे कष्टाचे काम मानले जाते. कारण पडदे काढून धुवून, वाळवून पुन्हा लावण्यास बराच वेळ लागतो. त्यामुळे बरेच लोक पडदे धुण्याचे टाळतात. पण आज आम्ही तुम्हाला असे काही सोपे उपाय सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही परदे स्वच्छ करू शकता. या टिप्सच्या मदतीने तुम्ही पडदे न काढता अगदी सहजपणे पडद्यांवरची घाण साफ करू शकता.

घरातील पडदे स्वच्छ करण्यासाठी खालील टिप्स वापरा

व्हॅक्युम क्लिनर

व्हॅक्युम क्लिनरच्या मदतीने तुम्ही अगदी सहजपणे घरातील पडदे साफ करू शकता. त्याचबरोबर तुम्ही घराचे पडदे आठवड्यातून एकदा व्हॅक्युम क्लिनरने सोप्या पद्धतीने स्वच्छ करू शकता. यामुळे पडद्यावर जास्त धूळ साचणार नाही आणि पडदे स्वच्छ राहतील. व्हॅक्युम क्लीनरच्या मदतीने तुम्ही पडदे साफ केले तर पडदे नव्यासारखे चमकत राहतील.

खिडक्या स्वच्छ ठेवा

तुम्हाला जर तुमचे पडदे व्यवस्थित आणि साफ ठेवायचे असेल तर त्यासाठी नियमितपणे खिडक्यांची स्वच्छता करा. व्हॅक्युम क्लिनरच्या मदतीने तुम्ही पडद्या सोबत खिडक्या ही साफ करू शकता. खिडक्या साफ राहिल्या तर पडदे कमी घाण होतील. पडदे स्वच्छ ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी खिडक्या स्वच्छ करायला पाहिजे.

स्टीम क्लीनरने साफ करा

जेव्हा तुम्ही पडदे स्वच्छ धुतात किंवा पूर्णपणे साफ करतात तेव्हा त्यानंतर पडद्यांना स्टीम क्लिनरने साफ करायला विसरू नका. स्टीम क्लीनरने स्वच्छ केलेले पडदे साफ केल्यास पडद्यांवर नव्या सारखी चमक येते.

स्प्रे च्या मदतीने पडदे साफ करा

जर तुम्हाला तुमच्या घरातील पडदे स्वच्छ आणि सुगंधित करायचे असेल तर पडद्यांची साफसफाई झाल्यावर त्यावर स्प्रे करा. यामुळे स्वच्छ धुतलेले पडदे चांगला सुगंध देऊ लागतील. यामुळे तुमच्या घरातील वातावरण आनंददायी आणि प्रसन्न राहील.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.