InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

पंतप्रधान मोदींच्या बायोपिकवर बंदी घालण्याची विरोधकांची मागणी

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला. या चित्रपटात विवेक ओबेरॉय प्रमुख भुमिकेत असून, ओमंग कुमार यांनी दिग्दर्शन केले आहे. मात्र आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

चित्रपटाचा वापर हा निवडणुकीत अजेंडा पसरवण्यासाठी केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

- Advertisement -

गोव्यातील काँग्रेसच्या विद्यार्थीसेनेनं ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटावर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली होती. आता डीएमके पक्षाने देखील निवडणूक होईपर्यंत या चित्रपटावर पूर्ण बंदी घालावी अशी मागणी केली आहे. हा चित्रपट 5 एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार असून, देशात ११ एप्रिलपासून मतदानाला सुरूवात होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.