नवीन वर्ष चांगलं जाण्यासाठी ‘या’ गोष्टी करून पाहा…

 सरत्या वर्षाच कडू-गोड आठवणी मागे सोडून नव्या वर्षात नवी सुरुवात करण्याचा तुम्ही संकल्प केला असेल. नवीन वर्ष उत्साहात, आनंदात आणि चांगल जावं यासाठी आम्ही तुम्हाला काही खास सोप्या टीप्स सांगणार आहोत. सुरुवातीपासून तुम्ही याचा वापर केला तर हे वर्ष तुम्हाला सुख, समृद्धी आणि समाधानाचं जाऊ शकतं. त्यासाठी करून तुम्हाला या गोष्टी रोज नक्की करायला हव्यात.

१. काल घडलेल्या गोष्टीतून काय चूकलं याचा विचार करा आणि त्यावर कसा पर्याय शोधता येईल हे ठरवा. आदल्या दिवशी घडलेल्या प्रसंगांचं शल्य मनात ठेवून भूतकाळासाठी न जगता वर्तमान आणि भविष्याचा विचार करा. यासाठी तुम्ही कायम आशावादी रहायला हवं.

२. रोज सकाळी मेडिटेशन किंवा ऊ कार केल्यानं आपल्या शरीरात चांगल्या लहरी निर्माण होतात. दिवसभरात तुमच्या भोवती अनेक प्रसंग घडतात त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. अशावेळी आपल्या विचारांवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. तुम्ही जेवढं सकारात्मक राहाल तेवढा दिवस उत्तम जाईल.

‘मलायकाशी लग्न केलं तर…’अर्जुन कपूरचा नवा खुलासा !

३. स्वत:ची मत ठरवा मत योग्य पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करा. आपल्याला स्वत:चं मत किमान ठरवता आलं पाहिजे. आपलं मत साध्या सोप्या आणि कोणत्याही पद्धतीनं ते उद्धट वाटणार नाही अशा शब्दात मांडता आलं पाहिजे. त्याचा चांगला परिणाम तुमचं काम आणि पारिवारिक जीवनावर होऊ शकतो.

४. जगाचा सल्ला घ्या पण कोणताही निर्णय घेताना तो स्वत: विचार करून घ्या. कारण चांगलं काय किंवा वाईट काय दोन्ही गोष्टी घडल्या तरी आपला निर्णय असतो. इतरांपेक्षा थोडं वेगळा विचार करण्याचा प्रयत्न करा.

५. सतत तणाव, दु:ख यामुळे आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होत असतो. स्वत:साठी आनंदी राहण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक दिवस आपल्याला चांगला वाटतो. आपले पाय खेचणारे आहेत त्यामुळे तुम्ही कायम आनंदी असाल तर त्याचा तुमच्या कामावर चांगला परिणाम होणार आहे.

रोज 2 केळी खाण्याचे आहेत ‘हे’ फायदे !

६. आपल्याला इतर कोणीही प्रोत्साहन दिलं नाही तरीही आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो हे कायम लक्षात ठेवा. अशावेळी आरश्यामध्ये स्वत:सोबत बोलण्याचा प्रयत्न करा. स्वत:ला प्रोत्साहन देणं आवश्यक आहे.

७. अशी कोणतीही समस्या नाही ज्याचं उत्तर नाही प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे. पण तुम्हाला प्रश्न किंवा नेमकी समस्या काय आहे हेच कळलं नाही तर त्याचं उत्तर शोधता येणार नाही. त्यामुळे नेमकी समस्या शोधण्याचा प्रयत्न केला तर उत्तर मिळू शकतं. या जगात कोणीही परफेक्ट नाही. प्रत्येकजण अनुभव आणि प्रयोगातून शिकतो.

८. रोज सकाळी उठल्यावर व्यायाम नक्की करा. तणाव कमी करण्याचा हा एक अतिशय महत्त्वाचा उपाय आहे. रोज किमान ३० मिनिटे सकाळी कोवळ्या वातावरणात व्यायाम करावा.व्यायामासोबत रोज सकाळी चिंतन करा. याने शरीरातील सगळा थकवा निघून जाईल. त्याचबरोबर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सकाळी गाणी सुद्धा ऐकू शकता. याने तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होऊ शकते.

९. आयुष्यात नियोजनाला आणि वेळेला फार महत्त्व आहे. एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही आणि चुकलेलं नियोजन तुमचा सगळा दिवस, वेळ आणि वर्ष संकट ओढवू शकतो. प्रत्येक छोट्या गोष्टीचं नियोजन केल्यानं ती गोष्ट यशस्वी होण्यासाठी मदत होते.

१०. नव्या वर्षात उत्तम आहार आणि आपला छंद नियमित ठेवण्यावर भर द्या. दिवसभरातील काही मिनिटं तुमचा छंद जोपासला तर क्षीण दूर होतो आणि एक समाधानही मिळतं. यासोबत उत्तम आणि निरोगी आरोग्यासाठी आहार आणि झोप महत्त्वाची असते. त्याचं गणित चुकली मग आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो आणि पर्यायाने कामावरही.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.