‘तुम्हाला काय म्हणायचे होते हे तुम्हाला तरी कळलं का?’, अमोल मिटकरींचा फडणवीसांना खोचक सवाल

मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट भाजपावर निशाणा साधला आहे. यावेळी मी नेतृत्व करण्यास तयार नव्हते, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. तर यावरूनच उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचं नव्हतं तर का झाले?, असं भाजपचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं.

आता फडणवीसांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरे नेतृत्व करण्यास तयार नव्हते. आपल्या जुन्या मित्राच्या चिरंजीवाला संधी द्यावी म्हणून मी उद्धव ठाकरेंचा हात वर केला, असं शरद पवार म्हणाले आहेत. यानंतर आता पवारांच्या या प्रतिक्रियेला पुन्हा फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं.

“साहेब! हा किती भाबडेपणा, व्दापार युगात सुईच्या टोका ऐवढी जमीन द्यायला नकार दिल्यामुळे महाभारत घडले. कलियुगात मात्र तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावले असे सांगणे म्हणजे कीती भाबडेपणा, असं म्हणत फडणवीसांनी पवारांना टोला लगावला आहे. तसेच पुढे मुख्यमंत्री पदावर भाष्य करताना “जो बुंद से गयी वो हौद से नहीं आती”, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी फडणवीस यांना खोचक सवाल विचारला आहे. ‘तुम्हाला काय म्हणायचे होते हे तुम्हाला तरी कळलं का?’ असे ट्विट मिटकरी यांनी केले. ‘नारायण राणे यांनी पक्ष का सोडला यापेक्षा एकनाथ खडसे, अनिल गोटे यांच्यासारख्या निष्ठावंतांनी भाजपाला का सोडले याचे उत्तर द्यायचा प्रामाणिक प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी करावा’ असा पलटवार मिटकरी यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा