InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

डॉक्टर पण चिंतेत आहे देश वाचवायचा कि दंगल घडवणाऱ्यांना?; अमित शहांच्या स्वाईन फ्लूवर टीका

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना स्वाईन फ्लू झाल्याने त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहांच्या आजारपणावर सध्या वादग्रस्त वक्तव्य करण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. काँग्रेस नेत्यानंतर आता पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने वादग्रस्त ट्वीट केले आहे.

देश वाचवायचा की दंगल घडवणाऱ्यांना? अशी चिंता डॉक्टरांना आहे. डॉक्टरांनी राष्ट्रधर्माचे पालन करावे, असे ट्वीट हार्दिक पटेल यांनी केले आहे. हार्दिकच्या या ट्वीटनंतर नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.