सरकार नावाची व्यवस्था अस्तित्वात आहे का उद्धवजी?; चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

मुंबई : मुंबईच्या साकीनाका परिसरात एका ३२ वर्षीय महिलेवर अमानुषपणे बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आलीय. मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महिलेवर बलात्कार करण्यात आल्यानंतर गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला होता.

या भयंकर घटनेवर राज्यभारात संतापाची लाट उसळली आहे.याच पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना संतप्त सवाल विचारला आहे कि अजुन साकीनाकाची भगिनी व अमरावतीच्या मुलीच्या चितेची आग विझलीही नसेल तर २४ तासाच्या आत आळेफाटा अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला.

तसेच नाशिकमध्ये महिलेची दुचाकी अडवत कारमध्ये नेऊन बलात्कार,अमरावतीत ७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला तर उल्हासनगर मध्येही अल्पवयीन मुलीवर बलात्कार.,सरकार नावाची व्यवस्था अस्तित्वात आहे का उद्धवजी?असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा