शरद पवारांचा न्यायालयावर विश्वास आहे की नाही? फडणवीसांचा खोचक सवाल

मुंबई : गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी, पार्थ पवार यांच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून काल छापे टाकण्यात आले होते. यावरून केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजप गैरवापर करत असल्याचा आरोपही केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या मुद्द्यावरून तपास यंत्रणांवर टीकास्त्र डागलं आहे.

याआधी शरद पवार म्हणाले होते कि, अजित पवारांकडे पाहुणे आलेत. पण यानंतर आता पाहुणे घरात किती दिवस राहणार याला काही मर्यादा असतात, जिथे छापे पडले तेथील चौकशी एका दिवसातही होऊ शकते, असं असताना 6 दिवस पाहुणचार घेणं कितपत योग्य? असा प्रश्नही शरद पवारांनी उपस्थित करत तपास यंत्रणांना टोला लगावला आहे.

पवारांच्या वक्तव्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीकेचे बाण सोडले आहेत. कोर्टाच्या आदेशानंतरही शरद पवार टीका करतात. त्यामुळे त्यांचा न्यायालयावर विश्वास आहे की नाही? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केलेले काही मुद्दे खोडण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर देखील टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा