‘कंगनाच्या सौंदर्यासमोर काहींना स्वातंत्र्य आंदोलनातील शहीदांचा अपमान ही जाणवत नाही का?’

मुंबई : भारताला स्वातंत्र्य १९४७ साली भीक म्हणून मिळालं, खरं स्वातंत्र्य तर २०१४ साली मिळालं आहे, अशा आशयाचं वादग्रस्त विधान करणारी अभिनेत्री कंगना रणौत हिच्यावर सध्या जोरदार टीका केली जात आहे. अनेक राजकीय नेत्यांनी तिच्या या विधानाचा निषेध केला असून काहींनी तिचा पद्मश्री पुरस्कार काढून घेण्याचीही मागणी केली आहे.

यातच आता कंगना रणौतचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. तसेच शिवसेनेनेही यावर आक्रमक भूमिका घेत कंगनाचे सर्व पुरस्कार कडून घेण्याची मागणी केली आहे. तर यावर काँग्रेसकडून देखील यावर प्रतिक्रिया आली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिलीय.

सुरवातीला तर अमोल मिटकरींनी कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही केलीय. कंगनाच्या सौंदर्यासमोर काहींना स्वातंत्र्य आंदोलनातील शहीदांचा अपमान ही जाणवत नाही का? स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करणारे मोदी आणि महाराष्ट्रातील त्यांचे देशभक्त नेते अजूनपर्यंत का गप्प आहेत?, असा खोचक सवाल अमोल मिटकरींनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा