काँग्रेसला ६० वर्षात जमलं नाही ते भाजपा सरकारनं ५ वर्षात केलं

- Advertisement -
काँग्रेसने ६० वर्षात जो विकास केला नाही तो भाजपा सरकारनं पाच वर्षांत केला. काँग्रेसने केवळ स्वत:चा विकास केला, असा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. आम्ही संविधान मोडणार असा अपप्रचार काँग्रेसकडून सतत केला जातो. पण आम्ही संविधान मोडणार नाही, तर संविधानाचा वापर करून गरिब, वंचितांना न्याय मिळवून देऊ, असं गडकरी यांनी सांगितले.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जमीन देण्याच्या मानसिकतेत तत्कालिन काँग्रेस सरकार नव्हती असा आरोप फडणवीस यांनी केला. काँग्रेस सरकार फक्त घोषणा करत होतं. दुसरीकडं भाजपा सरकार मात्र कृतीवर विश्वास ठेवत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Loading...
Related Posts
- Advertisement -
महत्वाच्या बातम्या –
Loading...