‘बदनामीला घाबरू नकोस…’; चिपळूणमधील त्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी भास्कर जाधवांना दिला सल्ला

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पावसाने उद्ध्वस्त झालेल्या चिपळूणमधील बाजारपेठेची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांना नुकसान भरपाईची विनवणी करणाऱ्या एका महिलेला शिवसेना नेते भास्कर जाधव दमदाटी केल्याचा आरोप आहे. या आरोपानंतर विरोधकांनी भास्कर जाधवांवर खरपूस टीका केली.

यानंतर यावरून मुख्यमंत्री भास्कर जाधवांना काय बोलले याबाबत भास्कर जाधवांनी माहिती दिली आहे. रविवारी झालेल्या आरोपानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मला मुंबईला जाईपर्यंत पाच ते सहा फोन आले. बदनामीला घाबरू नकोस. आपल्यामधील शिवसैनिक जागा ठेवून पूरग्रस्तांच्या मदतीला जा, असा सल्लाल मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं भास्कर जाधव म्हणाले.

चिपळूणच्या बाजारपेठेत मुख्यमंत्री व्यापारांशी बोलत होते त्यावेळी एक महिला आक्रोश करत होती. मुख्यमंत्र्यांचं त्या महिलेकडे लक्ष गेलं. त्यावेळेस पीडित महिला म्हणाली, तुम्ही काहीपण करा, आमदार, खासदारांचा एक महिन्याचा पगार फिरवा, पण आमचं नुकसान भरून द्या. मुख्यमंत्री त्यांना धीर देत होते मात्र त्यावेळी भास्कर जाधव आले. हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील. त्याने काही होणार नाही. चला चला बाकी काय तुझा मुलगा कुठंय अरे आईला समजव आईला समजव उद्या ये असं बोलले.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा