“फालतू आणि मूर्खपणा करू नका, हा कुणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न आहे”

मुंबई : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या ड्रग्ज प्रकरणी जेलमध्ये आहे. या प्रकरणानंतर यामध्ये काहीजण आर्यनवर टीका करताना दिसतात तर काहीजण आर्यन खानला समजून घेण्याची भूमिका घेताना दिसतात. त्यातच आता बॉलिवूड अभिनेत्री कुब्रा सैतने देखईल प्रतिक्रिया दिलीय.

आर्यनच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना कुब्रा म्हणाली, “लोकांसाठी सत्य बदलले जाऊ शकत नाही. खास करुन जेव्हा ते तथ्यांमध्ये फेरफार करू लागतात. किंवा केवळ मनोरंजनासाठी सत्य बाजूला ठेवून अफवा पसरवू लागतात. हे आजच नव्हे तर गेल्या अनेक वर्षांपासून घडत आलंय आणि हे खूपच दूर्दैवी आहे.” असं ती म्हणाली.

पुढे आर्यन खान हा एका सुपरस्टारचा मुलगा असल्यामुळे त्याच्यावर कारवाई केली जात आहे असं वाटतं का? या प्रश्नाचं उत्तर देताना ती म्हणाली, “त्यांचीही कुटुंबं आहेत आणि त्यांची स्वतःची प्रतिष्ठा आहे, स्वतःचं जीवन आहे. आपल्याकडे असलेल्या माध्यमांचा वापर जबाबदारीने करा. फालतू आणि मूर्खपणा करू नका हा कुणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न आहे.” असं ती म्हणाली.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा