मीडियात पब्लिसिटी स्टंट करू नका, पुरावे असतील तर कोर्टात जा; यास्मिन वानखेडेंचं मालिकांना आव्हान

मुंबई : आर्यन खान प्रकरणानं गेल्या काही दिवसांपासून वेगळं वळण घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांवरच भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर धक्कादायक आरोप केले होते.

यानंतर अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा वाद आणखीनच वाढत चालला आहे. यानंतर समीर वानखेडे हे अंतर्गत चौकशीसाठी दिल्लीच्या एनसीबी मुख्यालयात दाखल झाले आहेत. तसेच समीर वानखेडेंची बहीण यास्मिन वानखेडे यांनी त्यांच्यावर देखील आरोप केले आहेत. त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी यास्मिन वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

मीडिया समोर येऊन पब्लिसिटी स्टंट करू नका. तुमच्याकडे पुरावे असतील तर कोर्टात जा. आपला वेळ वाया घालवू नका. आम्ही तिथे तुम्हाला उत्तर देऊ, असं आव्हानच यास्मिन वानखेडे यांनी नवाब मलिक यांना दिले. मलिक आदरणीय मंत्री आहेत. पण त्यांना हे शोभत नाही. ते चुकीची माहिती देत आहेत. तुमच्याकडे पुरावे असतील तर कोर्टात जा. मीडियाला बोलवून केवळ प्रसिद्धी घेऊ नका. तुमचा वेळही वाया घालवू नका, असं यास्मिन वानखेडे यांनी सांगितलं.

हत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा