InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

पाकिस्तान सारखा शेजारी कोणालाही न मिळो- राजनाथ सिंह

- Advertisement -

भारताने आर्टिकल ३७० रद्द करत जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा आणि राज्याचा दर्जाही काढून घेतला. यानंतर पाकिस्तान बिथरला असून त्यांनी शक्य त्या पद्धतींनी तीव्र प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी भारताशी असलेले राजनैतिक आणि व्यापारी संबंध नुकतेच संपुष्टात आणले आहेत. यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘देव करो आणि ‘असा शेजारी’ कोणालाही न मिळो,’ असे म्हणत पाकला टोला लगावला आहे.

- Advertisement -

दरम्यान, भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही भारताशी असलेले संबंध संपवण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयावर टीका केली आहे. ‘जम्मू-काश्मीरशी संबंधित आर्टिकल ३७० विषयीचा निर्णय ही आमची देशांतर्गत बाब आहे. यावर पाकने प्रतिक्रिया देण्याचा संबंधच येत नाही. पाकिस्तान जगासमोर विनाकारण कांगावा करून दाखवत आहे,’ असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.