नुसतं देशाला बदनाम करण्याचा दावा करू नये : नवाब मलिक देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र 

मुंबई : देशात सध्या पेगॅसस फोन टॅपिंग प्रकरणावरून देशातील राजकारण तापलं आहे. इस्त्रायलच्या एनएसओ कंपनीने पेगॅसस हे हेरगिरी तंत्रज्ञान विकसित करून जगातील 1400 मोबाईल क्रमांक हॅक करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तर 300 भारतीय तसेच काही पत्रकारांचे देखील फोन टॅप झाल्याचा दावा 15 मीडिया संस्थांनी केलाय. याच प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आरोप केले आहेत. त्यावर आता नवाब मलिक यांनी प्रत्त्युतर दिलं आहे.

सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आरोप केले होते. फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आरोप केले आहेत. हा देशाला बदनाम करण्याचा डाव आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हंटल होतं. यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी उत्तर दिलं आहे.

“मनमोहन सिंग यांच्या काळात फोन टॅपिंग झाल्याचा दावा भाजप करत आहे. पण मनमोहन सिंग यांच्या काळात ज्यांनी ज्यांनी असे प्रकार केले, त्यांच्यावर मनमोहन सिंग यांनी कारवाई केली होती. आता भाजप सत्तेत आहे. त्यांनी देखील कारवाई करावी, असं नवाब मलिक म्हणाले. नुसतं देशाला बदनाम करण्याचा दावा करू नये,” असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा