संभाव्य तिसऱ्या लाटेचा विकासकामांवर परिणाम होऊ देऊ नका; उपमुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांना कानमंत्र

बारामती : तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी सर्वांनी सतर्कता बाळगावी, आपल्याला गाफील राहून चालणार नाही. उपचार यंत्रणा सज्ज ठेवण्यासोबतच कोरोनाच्या चाचण्या व सर्वेक्षणात सातत्य ठेवा. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढताना त्याचा विकास कामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

अजित पवार यांनी विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. बारामती तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी सर्वांनी सतर्कता बाळगावी. उपचार यंत्रणा सज्ज ठेवण्यासोबतच कोरोना चाचण्या व सर्वेक्षणात सातत्य ठेवा. कोणत्याही परिस्थितीमध्ये पॉझिटिव्हिटी रेट वाढणार नाही याची दक्षता घ्या.

संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढताना त्याचा विकासकामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्या, असे निर्देश पवारांनी अधिकाऱ्यांना दिले. नागरिकांनी मास्क वापरावा, कोरोना प्रादुर्भावाबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. अशा सूचनाही त्यांनी केल्या.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा