आमचे सण, मंदिरे,संस्कृती, अस्तित्व, श्रद्धा, यांच्याशी खेळू नका, नाहीतर तुमचाच खेळ होऊन जाईल!

पुणे : आगामी गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी उपमुखमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना उत्सवात गर्दी झाल्यास निर्बंध लावण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे संकेत दिले. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख मात्र या आदेशांना धुडकावत असल्याचे दिसत आहे. तसेच कोरोना नियमांचं उल्लंघनही केले आहे. तसेच शेख यांच्या विविध कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचं दिसत आहे.

महेबूब शेख यांचे सध्या विविध ठिकाणी दौरे सुरु आहेत. तसेच त्यांच्या कार्यक्रमांना लोक हजेरी लावत असून ठिकठिकाणी जाऊन गर्दी जमवत असल्याचे दिसून येत आहे. शेख हे काल दर्यापुर तालुका जिल्हा अमरावती येथे रात्री १२:३० वाजता पोहचले. यावेळी त्यांच्या उपस्थितीत याठिकाणी गर्दी झाल्याचं निदर्शनास आलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतलाय.

महविकास आघाडी सरकार आणि त्यांचे मंत्री, पदाधिकारी खिशात कोरोना घेऊन फिरतात राव, त्यांच्या सोयीनुसार ते सर्वसामान्य जनतेत, विरोधकांमध्ये पसरवतात, कोरोना वाढवतात, सोय फक्त त्यांची, कार्यक्रम पण फक्त त्यांचेच, हेच जर दुसऱ्यांनी केले की, आहे गृहखाते आणि त्यांचे पोलीस गुन्हा दाखल करणार जसा कायदा यांच्या हाताचे बाहुली असल्यासारखे…, असं म्हणत रुपाली पाटील ठोंबरे यांनी महाविकास आघाडीला टीकेचे लक्ष्य केले आहे.

वा रे..!, महविकास आघाडी सरकार सत्तेचा गैरवापर दणक्यात सुरू असल्याचे हे उत्तम उदाहरण आहे. पण लक्षात ठेवा सत्ता ही कायमची नसते आपले मागील दिवस आठवा. आमचे सण, आमची मंदिरे, आमची संस्कृती, आमचे अस्तित्व, श्रद्धा, आहे. त्यांच्याशी खेळू नका तुमचाच खेळ होऊन जाईल, असा इशारा मनसेच्या रुपाली पाटील यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा