‘किसी को भी नही बक्षेंगे’; अहमदनगर जिल्हा रूग्णालय आग प्रकरणी हसन मुश्रीफ आक्रमक

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागल्याने 10 रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेवरून राज्य सरकार विरूद्ध केंद्र सरकार असं राजकारण रंगत असल्याचं पाहायला मिळत आहे.

पंतप्रधान निधीतून मिळालेल्या निकृष्ट दर्जाच्या व्हेंटिलेटरमध्ये स्पार्क झाला आणि अहमदनगर जिल्हा रूग्णालयात आग लागल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला. तर अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रिफ व्हेंटिलरच्या मुद्द्याचं समर्थन करताना दिसले. अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील या घटनेनंतर हसन मुश्रिफ अहमदनगरला पोहोचले.

रात्री उशीरा अहमदनगरला पोहोचल्यानंतर त्यांनी जिल्हा रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागाची पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी या घटनेची सखोल चौकशी होईल असं आश्वासनही दिलं. या दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर निश्चित कारवाई होईल, किसी को भी नही बक्षेंगे, असंही हसन मुश्रिफ म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा