“भाजपला मत देऊ नका, भाजप सरकार फसवणूक करीत आहे”: राकेश टिकैत

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरूद्ध दिल्लीच्या सीमेवर २०० दिवसांहून अधिक काळ आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी २६ जून रोजी देशभरातील राजभवनांना घेराव घालण्याची घोषणा केली आहे. त्यांनी ट्वीट करत, नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी डेथ वॉरंट असल्याचे म्हटले आहे.

माध्यमांशी बोलताना टिकैत म्हणाले की, “आंदोलनाला आता सात महिने झाले आहेत. याबाबत राज्यपालांना निवेदन देण्यात येईल. यापूर्वी टिकैत यांनी दोन ट्वीट केले होते. ज्यात त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना हा संदेश दिला की जर पाणी, जंगल आणि जमीन वाचवायची असेल तर दरोडेखोरांविरूद्ध लढा द्यावा लागेल. दुसर्‍या पोस्टमध्ये ते म्हणाले होते की सरकारने तीनही कायदे रद्द करावे आणि एमएसपीवर कायदा करावा.”

तसेच, “उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपाला मत देऊ नका. भाजप सरकार फसवणूक करीत आहे. उसाचे देय मुळीच वाढलेले नाही, हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे बोलत नाही, म्हणून आम्ही त्यांच्यावर बहिष्कार टाकला आहे,” असं राकेश टिकैत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा