तुमच्या लिखाणावर रोषही व्यक्त करायचा नाही का?, ही दंडुकेशाही चालणार नाही!

मुंबई : मुंबईत शिवसेना भवनासमोर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एखाद्या कुटुंबात नवरा बायको भांडतात आणि मग एकत्र बसून चहा पीत बसतात. राजकारणात एखाद्या घटनेवरून विषय समाप्त होत नाही असं सूचक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

देशविरोधी बोलणाऱ्याच्या सुरात तुम्ही का सूर मिसळता असा सवाल देखील त्यांनी सेनेला विचारला. तसेच विशेष अधिवेशन झालं नाही तर आत्ता होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात तरी आरक्षण प्रश्नावर चर्चा करायला दोन दिवस राखून ठेवा अशी मागणी पाटील यांनी केली. पुण्यात आज चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

काल झालेल्या मारामारी बद्दल बोलताना पाटील म्हणाले, शिवसेना भवनासमोर जे झालं ते क्लेशदायक आहे. एका खुर्चीपायी हे होणं हे क्लेशदायक आहे, असं सांगतानाच तुम्ही रोज सामानातून वाट्टेल ते लिहिणार, जे लिहिता त्याला आधारही नसतो. त्यावर निदर्शने करायची नाही का? रोषही व्यक्त करायचा नाही का?, ही दंडुकेशाही चालणार नाही! असा सवाल पाटील यांनी केला. १५ दिवसांपूर्वी शिवसेनेने भाजप कार्यालयासमोर आंदोलने केली. त्याआधी काँग्रेसनेही आंदोलने केली. तेव्हा आम्ही अडवलं नाही, असेही पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा