अदर पूनावाला यांच्या व्यवहाराबद्दल संशय : नवाब मलिक

काही दिवसांपूर्वी पुण्यातील सीरम इन्स्टिटय़ूटचे प्रमुख अदर पूनावाला यांनी इंग्लंडमध्ये एका मुलखातील आपल्याला राजकीय नेत्यांकडून धमक्या येत आहेत असे सांगितले होते. त्यांनी केलेल्या या खुलास्यामुळे राजकीय नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

यावर काँग्रेसचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी धमकी कुणी दिली याचा पूनावाला यांनीच खुलासा करावा, असे म्हंटले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पंसख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी कोरोना प्रतिबंधक लशीच्या वेगवेगळ्या किमती ठरविणाऱ्या पूनावाला यांच्या व्यवहाराबद्दल संशय व्यक्त केला आहे.

केंद्र सरकारला १५० रुपये, राज्याला आधी ४०० रुपये आणि नंतर ३०० रुपये, तर खाजगी रुग्णालयांना ७०० रुपये दराने लस देण्याचे अदर पूनावाला यांनी जाहीर केले. हा सगळा संशय निर्माण करणारा विषय असून त्याला पूनावाला स्वत: जबाबदार आहेत. त्यांना कोणी बदनाम करीत नाही, अशी टीका नवाब मलिक यांनी केली.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा