InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘बैलगाडा शर्यत केवळ करमणुकीचे साधन नाही’; संसदेत ‘डॉ.कोल्हें’चे जोरदार भाषण

संसदेचे अधिवेशन दिल्लीत सुरु असें शिरूरचे राष्ट्रवादीचे नवे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोमवारी लोकसभेत आपले पहिले भाषण केले. यावेळी अमोल कोल्हे यांनी महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच मागील पाच वर्षात देशातील स्वायत्त संस्थांवर झालेले हल्ल्यांवर भाष्य केले. अशा स्वायत्त संस्थांचे स्वातंत्र्य अबाधित राखले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

तसेच या अधिवेशनात अमोल कोल्हे यांनी पशु आरोग्याचा मुद्दयालाही हात घातला यावेळी त्यांनी बैलगाडी शर्यत बैलगाडा शर्यत केवळ करमणुकीचे साधन नसून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे, असेही स्पष्ट केले.

इतक्या वर्षात अडळराव पाटलांना जमलं नाही ते अमोल कोल्हेंनी पहिल्या आठवड्यातच करून दाखवलं…🙏

Geplaatst door Supriya Sule FC op Maandag 24 juni 2019

 

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. डॉ. कोल्हे यांनी शेकऱ्यांच्या आत्महत्या व शेतमालाचा भाव हे मुद्दे देखील अधोरेखीत केले. मागील काळात सरकारने इजिप्त व पाकिस्तान या देशातून कांदा  आयात केल्याने शेतकऱ्यांचे नॉथय प्रमाणावर नुकसान झाले.  त्यामुळे सरकारने आयात निर्यात धोरण बनवावे पण त्यात उत्पादक व ग्राहक या दोघांचे हिट होईल असे धोरण बनवावे त्यामुळे शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने सन्मान होईल. असे डॉ. कोल्हे यांनी स्पष्ट केले.

तसेच केवळ कागदोपत्री योजना करू नयेत त्या प्रत्यक्षात देखील राबवाव्या असे ते म्हणाले. ज्या प्रमाणे एखाद्या कामात सफलता मिळाल्यानंतर त्याचे श्रेय घेतले जाते, त्याचप्रमाणे एखाद्या कामात जर अपयशी झालो तर त्याचे उत्तरदायित्व स्वीकारण्याची जबाबदारी देखील सरकारची असते, असे ते म्हणाले.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply