InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘गर्ल्स’ सिनेमाच्या पोस्टरवरुन वाद, डॉ. सलील कुलकर्णी यांच्याकडून निषेध

- Advertisement -

सिनेमाचं दुसरं पोस्टर आलं आणि चर्चा सुरू झाली आहे. या पोस्टरवर ‘आयुष्यावर बोलू काही’ असं लिहिलेला टी-शर्ट घातलेली एक तरूणी असभ्य हावभाव करते आहे. यावरून डॉ. सलील कुलकर्णी यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मराठी सिनेविश्वात खूप नवनवे विषय हाताळले जाता आहेत. मराठी प्रेक्षकांनीही या विषयांचं स्वागत केलं आहे. केवळ कौटुंबिक नव्हे, तर कॉलेजवयीन मुलांना आकर्षित करण्यासाठीही बॉईज, टकाटक सारखे सिनेमे येऊ लागले आहेत. बॉइजला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता आता त्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘गर्ल्स’ हा सिनेमा बनवला आहे. यात तीन मुलींची गोष्ट असल्याचं या सिनेमाच्या पोस्टरवरून वाटतं. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचं पहिलं पोस्टर आलं. मात्र आज दुसरं पोस्टर आल्यावर मात्र जरा कल्लोळ उडाला आहे.

Loading...
Related Posts

लहान मुलाबरोबर कुस्ती खेळल्यावर पैशांऐवजी रेवड्या मिळतात, शरद…

या नव्या पोस्टरमध्ये सिनेमातली एक अभिनेत्री दिसते. त्यात तिने ‘आयुष्यावर बोलू काही’ असं लिहिलेला टी शर्ट घातला आहे. तर #FamilySucks असंही यावर लिहीलं आहे. हा टी-शर्ट घालून तिने हावभाव केले आहेत. हे पोस्टर सकाळी आलं आणि त्यावर उलटसुलट प्रतिक्रियांना सुरूवात झाली. आयुष्यावर बोलू काही टी-शर्ट घालून या मुलीने केलेल्या हावभावाचा पहिला निषेध नोंंदवला आहे तो डॉ. सलील कुलकर्णी यांनी. महाराष्ट्रातल्या तमाम रसिकांना संदीप खरे आणि सलील यांनी आपल्या या कवितांच्या कार्यक्रमाने वेड लावलं आहे. आजही याचे कार्यक्रम देशा-परदेशात होताना दिसतात. सलील यांनी मात्र या पोस्टरचा निषेध केला आहे. फेसबुकवर यासंबंधीची पोस्ट त्यांनी शेअर केली असून त्यात या पोस्टरचा निषेध करण्यात आला आहे

- Advertisement -

नाती .. आई – बाबा..घर ..ह्या हळव्या विषयांना हात घालणारा आमचा आणि तुमचा लाडका कार्यक्रम मराठी कविता आणि गाण्यांचा."…

Saleel Shriniwas Kulkarni ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಅಕ್ಟೋಬರ್ 9, 2019

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.