गोमूत्र अर्क प्यायल्याने होतो फुफ्फुसांतील संसर्ग दूर; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा अजब दावा

भोपाळ : भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या नेहमी कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असतात. मागील वर्षी त्यांनी कोरोनापासून वाचण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगितले होते. हनुमान चालिसाचं सामूहिक वाचन त्याचबरोबर कोरोनासाठी यज्ञ करायला लावणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आता त्यांनी कोरोना होऊ नये म्हणून एक अजब सल्ला दिला आहे.

जगभरातले शास्रज्ञ कोरोनावरील लस आणि विषाणूच्या नवनवीन उपाय शोधण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सध्या वेगवेगळ्या व्हिडिओंमधून आयुर्वेदिक उपचार सुचवले जात आहेत. गोमूत्र अर्क प्यायल्याने फुफ्फुसांतील संसर्ग दूर होतो. मी रोज गोमूत्र अर्क पिते त्यामुळे मला कोरोना झालेला नाही. प्रत्येकाने देशी गाय पाळली पाहिजे आणि गोमूत्र प्यायला पाहिजे.” मला कोरोनाही झाला नाही, असं अजब वक्तव्य प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे. असे मत प्रज्ञासिंह यांनी व्यक्त केले आहे.

संत नगरमधील परिसरात असलेल्या डॉ. हेडगेवार रुग्णालयाला 25 ऑक्सिजन कंसन्ट्रेटर देण्यासाठी प्रज्ञासिंह ठाकूर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी हे अजब वक्तव्य केलं. त्याचबरोबर प्रज्ञासिंह ठाकूर यांनी देशी गाय पाळण्याचं आवाहन केलं. तसेच त्या स्वतः एक कोटी वृक्ष लावणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. काही दिवसांपुर्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या बंगल्यातील सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे प्रज्ञासिंह ठाकूर यांना क्वॉरंटाईन व्हावं लागलं होतं.

दरम्यान, साध्वी यांनी कोरोनावर मात करण्यासाठी नुकतच हनुमान चालिसाचं सामूहिक वाचन करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी टीका देखील केली होती. यावर ‘कितीही हनुमान चालिसाचं वाचन कर पण तुझा जीव वाचणार नाही’, अशी धमकी दिल्याचा दावा साध्वी यांनी केला होता.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा