InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

जास्त चहाने हाडांना होते ही गंभीर समस्या, जाणून घ्या ?

चहा पिण्याची सवय अनेकदा फार जास्त वाढते आणि त्याचे नुकसान वेळोवेळी बघायला मिळतात. याने वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने आणि रोज एकपेक्षा जास्त वेळ चहा प्यायल्याने स्केलेटल फ्लोरोसिससारखा आजार होऊ शकतो. या आजारात आपली हाडे आतल्या आत कमजोर होता.

चहाने हाडांचं नुकसान अचानक किंवा एकाएकी नाही तर फार उशीरा झालेलं बघायला मिळतं. चहाचा प्रभाव चहाची क्वालिटी, पिणाऱ्याचं शरीर आणि जेनेटिक्सच्या स्थितीवर निर्भर करतं. त्यासोबत चहा घेण्याची वेळ आणि चहा तयार करण्याची पद्धत यावरही निर्भर असतं. दुध आणि साखर असलेला चहा सतत पित राहणे चांगले नाही.

या गोष्टींची घ्या काळजी

चहा दिवसातून तीनपेक्षा जास्त वेळ घेऊ नये. खासकरुन रिकाम्या पोटी तर अजिबात घेऊ नये. प्रयत्न करा की, सामान्य चहाऐवजी ग्रीन टी, हर्बल टी सेवन करा. जेवणाआधी किंवा जेवणानंतर लगेच चहा घेऊ नका.

चहा प्यायल्यानंतर गुरळा करा आणि अर्ध्या तासाने भरपूर पाणी प्यावे. त्यासोबतच चहाची आठवण झाल्यावर छाछ, नारळाचं पाणी किंवा ज्यूस प्यायल्याने चहाची सवय सुटू शकते.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.