InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

शेतकऱ्यावर दुष्कळाचे सावट; वातावरणात ढग पाऊस मात्र गायब

यंदाच्या पावसाळ्याचे १२० पैकी ४० दिवस झाले असतानाही पावसाची सरासरी कमी आहे. विशेष म्हणजे, २४ जूनला मान्सूनचे आगमन झाल्यानंतर सक्रिय न झाल्याने जुलै उजाडला तरी जिल्ह्यातील अर्ध्याअधिक पेरण्या रखडल्या आहेत. येत्या १७ तारखेपर्यंत पावसाची ही स्थिती कायम राहणार असल्याची हवामानतज्ज्ञांनी वर्तविली. त्यामुळे सलग तीन वर्षांपासून दुष्काळ अन् नापिकीने आर्थिक कोंडीत सापडलेला शेतकरी पुन्हा दुष्काळाच्या स्थितीने धास्तावला आहे.

यंदाच्या पावसाळ्यात पावसाने जून अखेरीची सरासरीही गाठलेली नाही. ३० जूनपर्यंत १४३.६ मिमी पाऊस अपेक्षित होता; मात्र प्रत्यक्षात १३३.२ मिमी पाऊस झाला तर ११ जुलैपर्यंत केवळ २१६.२ मिमी पाऊस झालेला आहे. या आठवड्यात वातावरण ढगाळलेले असताना पाऊस मात्र बेपत्ता आहे. त्यामुळे अर्ध्याअधिक क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या आहेत. जमिनीत आर्द्रता नाही. भूजलात प्रचंड घट आहे. सिंचन विहिरींनी तळ गाठलेला आहे. ही स्थिती यंदाही दुष्काळाची चाहूल देणारी असल्याने सद्यस्थितीत बळीराजा धास्तावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply