InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या ‘झिंगाट’ तरुणींना सिंघम लेडीने धु-धु धुतले

पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या ‘झिंगाट’ तरुणींना सिंघम लेडी मनीषा पाटीलने धु-धु धुतले. भाईंदर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक मनीषा पाटील यांनी रात्री नशेत तर्र झालेल्या युवतींना चांगलाच चोप दिला. दारूच्या नशेत या तरुणींनी पोलिसांनाच शिवीगाळ सुरू केली होती. त्यामुळे मनीषा पाटील यांनी भररस्त्यावर या मद्यधुंद तरुणीना सिंघम स्टाईल धुलाई करीत गाडीत बसवले. मारहाणीचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेयर केला जात आहे.

या चार मुली रात्री एका पार्टीत जाऊन मद्यपान करून आल्या होत्या, नशेत असलेल्या या तरुणी आपसात भांडत होत्या.  पेट्रोलिंगला असलेल्या पोलीस अधिकारी मनीषा पाटील यांनी मुलींना समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु नशेत असलेला मुलींने भांडणं सुरूच ठेवली. त्या इतक्या नशेत होत्या की आपण काय बोलतो याचंही भान नव्हतं.

पोलिसांनी चार युवतींवर पोलिसांवर हल्ला, सरकारी कामात अडथळा आणणे याबाबत गुन्हे दाखल केले आहे. अलिशा अयोस पिल्ले, कमला श्रीवास्तव, ममता मेयर आणि पडाळी डिकोस्टा असं आरोपी मुलींची नावं आहे. यापैकी तीन मुलींना पोलिसांनी अटक केलीये. तर पडाळी डिकोस्टा फरार आहे.

महत्वाच्या बातम्या – 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply