Dry Cough | कोरड्या खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Dry Cough | टीम महाराष्ट्र देशा: कोरडा खोकला (Dry Cough) अनेक वेळा औषधे घेऊन देखील बरा होत नाही. कोरडा खोकला दीर्घकाळ राहिल्याने घसा खवखवणे, सूज येणे, घसा दुखणे इत्यादी समस्या निर्माण होतात. त्याचबरोबर कोरड्या खोकल्याचा त्रास वाढल्याने रात्री झोप देखील व्यवस्थित राहत नाही. त्याचबरोबर कोरड्या खोकल्यावर सतत औषधी घेतल्यामुळे तोंडाची चवही बिघडते. त्यामुळे कोरड्या खोकल्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही औषधी सोबतच काही घरगुती पर्यायांचा वापर केला पाहिजे. हे घरगुती उपाय करून तुमची कोरड्या खोकल्याची समस्या दूर होऊ शकते. कोरड्या खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी पुढील घरगुती उपाय करा.

गरम पाणी आणि मीठ

कोरडा खोकला असताना गरम पाणी प्यायल्याने खोकल्याची समस्या सहज कमी होऊ शकते. गरम पाणी पिल्याने घशाला आराम मिळतो. त्याचबरोबर बंद झालेला घसा देखील खुलतो. गरम पाण्यामध्ये मीठ टाकून गुळण्या केल्याने घशाच्या संसर्गाची समस्या दूर होते. कारण यामध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म आढळतात. त्यामुळे कोरड्या खोकल्यावर मात करण्यासाठी तुम्ही गरम पाण्यामध्ये मीठ मिसळून त्याचे सेवन करू शकतात.

हळद

हळद आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. हळदीचे नियमित सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्याचबरोबर कोरडा खोकला ही बरा होतो. कारण हळदीमध्ये अँटिव्हायरस अँटीबॅक्टरियल गुणधर्म मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. हे गुणधर्म कोरडा खोकला आणि घशातील संसर्ग दूर करण्यास मदत करतात. यासाठी तुम्ही दुधामध्ये चिमूटभर हळद मिसळून पिऊ शकतात.

आले आणि मीठ

कोरडा खोकला बरा करण्यासाठी आले आणि मीठ हा एक रामबाण उपाय ठरू शकतो. यांच्या वापराने कोरडा खोकला आणि कफची समस्या दूर होते. यासाठी तुम्हाला आल्याचा एक इंच तुकडा चिमूटभर मिठामध्ये बुडवून दाताखाली दहा ते पंधरा मिनिटे दाबून ठेवावा  लागेल. दहा ते पंधरा मिनिटानंतर तुम्हाला कोमट पाण्याने गुळण्या कराव्या लागतील. असे केल्याने कोरड्या खोकल्याचा त्रास दूर होऊन कफही बरा होतो.

कोरडा खोकला दूर करण्यासाठी तुम्ही या घरगुती उपायांचा वापर करू शकतात. पण जर हे उपाय करून तुमचा कोरडा खोकला बरा झाला नाही, तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.