Dry Fruits | उन्हाळ्यामध्ये ‘या’ ड्रायफ्रूटचे सेवन करणे आरोग्यासाठी ठरू शकते फायदेशीर

Dry Fruits | टीम महाराष्ट्र देशा: ड्रायफ्रूट्स सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. ड्रायफ्रूट्समध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व आढळून येतात, जे आरोग्याची काळजी (Health care) घेण्यास मदत करतात. त्याचबरोबर ड्रायफूटमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते, जे पचनसंस्था मजबूत ठेवण्यास मदत करते. उन्हाळ्यामध्ये ड्रायफ्रूटचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. आरोग्य तज्ञांच्या मते, उन्हाळ्यामध्ये खालील ड्रायफ्रूटचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात.

खजूर (Dates-Dry Fruits)

उन्हाळ्यामध्ये खजुराचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही उन्हाळ्यात दिवसभरात दोन ते तीन खजुराचे सेवन करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही उन्हाळ्यामध्ये रात्रभर पाण्यात भिजवलेले खजूर सकाळी रिकाम्या पोटी खाऊ शकतात. सकाळी रिकाम्या पोटी पाण्यात भिजवलेले खजूर खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात.

अंजीर (Fig-Dry Fruits)

अंजीरामध्ये अनेक पोषक तत्व आढळून येतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही उन्हाळ्यामध्ये दररोज दोन ते तीन सुकलेल्या अंजिराचे सेवन करू शकतात. हे अंजीर तुम्हाला साधारण चार ते पाच तास पाण्यात भिजवून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला त्याचे सेवन करावे लागेल. भिजवलेल्या अंजिराचे सेवन केल्याने शरीर तंदुरुस्त राहू शकते.

मनुका (Raisin-Dry Fruits)

मनुका आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात, त्यामुळे बहुतांश लोक वर्षभर मनुक्याचे सेवन करतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये मनुक्याचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. यासाठी तुम्ही हिरवे किंवा काळे कोणत्याही मनुक्याचे सेवन करू शकतात. यासाठी तुम्हाला तीन ते चार तास आधी मनुके पाण्यात भिजवून ठेवावे लागेल. त्यानंतरच तुम्हाला त्याचे सेवन करावे लागेल. उन्हाळ्यामध्ये निरोगी राहण्यासाठी तुम्ही पाच ते सहा मनुक्याचे दिवसभरात सेवन करू शकतात.

उन्हाळ्यामध्ये वरील ड्रायफ्रूट्सचे सेवन केल्याने तुम्ही निरोगी राहू शकतात. त्याचबरोबर डाळिंबाच्या रसाचे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

पचनसंस्था मजबूत राहते (Digestive system remains strong-Pomegranate Juice Benefits)

डाळिंबाच्या रसाचे नियमित सेवन केल्याने पचनसंस्था मजबूत होऊ शकते. डाळिंबामध्ये माफक प्रमाणात फायबर आढळून येते, जे पचनक्रिया मजबूत बनवण्यास मदत करते. डाळिंबाच्या रसाचे नियमित सेवन केल्याने तुम्ही बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, अपचन, पोट दुखी यासारख्या समस्यांपासून तुम्ही दूर राहू शकतात. पोटाचे आरोग्य राखण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात या रसाचा समावेश करू शकतात.

मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी फायदेशीर (Beneficial to increase metabolism-Pomegranate Juice Benefits)

डाळिंबाचा रस प्यायल्याने शरीरातील मेटाबॉलिजम वाढण्यास मदत होते. डाळिंबाच्या रसाचे सेवन केल्याने शरीरातील मेटाबॉलिझम नियंत्रणात राहते, परिणामी शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही तुमच्या आहारात डाळिंबाच्या रसाचा समावेश करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या