Dry Lips | उन्हाळ्यामध्ये फाटलेल्या ओठांची काळजी घेण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Dry Lips | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळा येताच ओठांशी संबंधित अनेक समस्या सुरू होतात. त्याचबरोबर सूर्यप्रकाश, धूळ, माती इत्यादी गोष्टींमुळे आपल्या ओठांवर परिणाम होतात. उन्हाळ्यामध्ये अनेकांना ओठ फाटण्याची समस्या निर्माण होते. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे ओठ कोरडे होतात. या समस्यावर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक रसायनयुक्त उत्पादनांचा वापर करतात. मात्र, ही उत्पादन ओठांसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे ओठांची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकतात. खालील घरगुती उपाय केल्याने ओठ सुंदर आणि मुलायम होतात.

मध (Honey-For Dry Lips)

ओठांची काळजी घेण्यासाठी तुम्ही मधाचा वापर करू शकतात. मधामध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म आढळून येतात, जे ओठांची काळजी घेण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला ओठांवर दहा ते पंधरा मिनिटे मध लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे ओठ थंड पाण्याने धुवावे लागतील. नियमित मधाचा वापर केल्याने ओठ मऊ आणि चमकदार होऊ शकतात.

काकडी (Cucumber-For Dry Lips)

उन्हाळ्यामध्ये काकडीचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. काकडीमध्ये 90% पाणी आढळून येते, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. कोरड्या ओठांच्या समस्यावर मात करण्यासाठी तुम्हाला साधारण दहा ते पंधरा मिनिटे काकडीचा रस ओठांवर लावून ठेवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे ओठ सामान्य पाण्याने धुवावे लागतील. दिवसातून एक ते दोन वेळा याचा उपयोग केल्याने ओठ मऊ आणि चमकदार होतात.

गुलाब जल (Rose water-For Dry Lips)

गुलाब जल आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. यासाठी तुम्हाला एक चमचा गुलाब जलमध्ये एक चमचा ग्लिसरीन मिसळून घ्यावे लागेल. कापसाच्या मदतीने तुम्हाला हे मिश्रण ओठांवर लावावे लागेल. हे मिश्रण कोरडे झाल्यानंतर तुम्हाला तुमचे ओठ थंड पाण्याने धुवावे लागेल. या मिश्रणाच्या मदतीने तुमचे ओठ गुलाबी आणि मऊ होऊ शकतात.

ओठांची काळजी घेण्यासाठी तुम्ही वरील घरगुती उपाय करू शकतात. त्याचबरोबर चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी तुम्ही दुधाच्या मला याचा खालील पद्धतीने वापर करू शकतात.

हळद आणि दुधाची मलाई (Turmeric and milk cream For Glowing Skin)

चेहरा चमकदार बनवण्यासाठी अनेक शतकांपासून हळदीचा वापर केला जातो. त्याचबरोबर चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी तुम्ही दुधाच्या मलाईचा आणि हळदीचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला दोन चमचे मलाईमध्ये दोन चमचे हळद मिसळून पेस्ट बनवून घ्यावी लागेल. ही पेस्ट तुम्हाला साधारण पंधरा ते वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवावा लागेल. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेवरील डाग दूर होतात.

बेसन आणि मलई (Besan and cream For Glowing Skin)

त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही मलई आणि बेसनाचे मिश्रण चेहऱ्याला लावू शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा बेसनामध्ये एक चमचा मलाई मिसळून मिश्रण तयार करून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जाते आणि त्वचा चमकदार होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.