InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मनमानीमुळे भारतीय संघात दुही

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत टीम इंडियाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर भारतीय क्रिकेटचे रण पेटले आहे. फलंदाजीची क्रमवारी, त्यावरून कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक यांच्यात मतभेद झाल्याची चर्चा एकीकडे सुरू असताना कोहली-शास्त्री यांच्या संघातील मनमानीविरुद्ध संघात दुफळी निर्माण झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरत आहे. फलंदाजीच्या चौथ्या क्रमांकावर अगोदरच वाद झाले आहेत. त्यातच उपांत्य सामन्यात धोनीला खालच्या क्रमांकावर का फलंदाजीस पाठविले, यावरून बीसीसीआयचे पदाधिकारी शास्त्रींवर उघड नाराजी व्यक्त करीत आहेत.

काही खेळाडू शास्त्री-कोहली कोणालाही न विचारता स्वतः निर्णय घेत असल्याचे बोलत असल्याचे वृत्त प्रसिद्ध होत आहे. परंतु कोणीही त्यास दुजोरा दिलेला नाही. भारतीय संघ रविवारी इंग्लंडहून प्रयाण करणार आहे. मात्र, उपकर्णधार रोहित शर्मा शुक्रवारी रात्रीच मुंबईत दाखल झालेला आहे.  

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply