जातीबाहेर लग्‍न केल्‍याने वडिलांकडून माझ्या जीवाला धोका

उत्तर प्रदेशमधील बरेली जिल्‍ह्‍यातील चैनपूरमधील भाजप आमदार राजेश कुमार मिश्रा यांच्‍या मुलीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. जातीबाहेर लग्‍न केल्‍याने वडिलांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा त्या मुलीने केल. मात्र, भाजप आमदार राजेश कुमार मिश्रा यांनी हे सर्व आरोप फेटाळले. तसेच त्‍यांनी म्‍हटले आहे की, माझी मुलगी सज्ञान आहे व तिला निर्णय घेण्‍याचे संपूर्ण स्‍वातंत्र्य आहे. तसेच मी व माझ्‍या घरच्‍या कोणत्‍याच व्‍यक्‍तीकडून अशी धमकी देण्‍यात आलेली नाही.

भाजप आमदार राजेश कुमार मिश्रा यांच्‍या मुलीचे नाव साक्षी आहे. माझ्‍या वडिलांकडून मला धोका आहे. साक्षीने पोलिसांकडून संरक्षण मिळावे अशी मागणी देखील या व्‍हिडिओत  केली आहे.  साक्षी आपल्या वडिलांचा आणि भावाचा टोपण नावाने उल्लेख केला आहे. ‘पप्पू भरतौल’ आणि ‘विकी भरतौल’ असा उल्लेख या व्‍हिडिओत करत आहे.

महत्वाच्या बातम्या-

अबब ! सरकारनं तुमचा डेटा विकून कमावले कोट्यवधी रुपये

वाळू माफियांचा अधिकाऱ्यावर हल्ला

युवासेनेच्या कार्यकर्त्यांची अभाविपच्या कार्यकर्त्यांना मारहाण

एका मराठ्यानं एक लाख मतांचं नियोजन करा – पंकजा मुंडे

गोव्यातील आमदारांना भाजप कडून कोट्यवधींची ऑफर- डॉ चेल्लाकुमार

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.