InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

तांत्रिकासोबत शरीरसंबंधाला नकार दिल्यामुळे पतीने घेतला पत्नीचा जीव

- Advertisement -

तांत्रिकासोबत शरीरसंबंध ठेवायला नकार दिला म्हणून ३२ वर्षीय महिलेला तिच्या नवऱ्याने नदीत बुडवून मारले.

उत्तर प्रदेशात अलीगडमध्ये गुरुवारी ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी महिलेचा नवरा आणि तांत्रिकाला ताब्यात घेतले आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

- Advertisement -

या जोडप्याचा मुलगा गुन्ह्याचा साक्षीदार आहे. महिलेचा भाऊ राजेश कुमारने दादोन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. घटनेच्या दोन दिवसआधी बहिणीने आपल्याला फोन करुन हस्तक्षेप करण्यास सांगितले होते असे राजेश कुमारने पोलिसांना सांगितले.

मानपालने पत्नीची समजूत घातली व तिला नदीकाठी घेऊन गेला तिथे त्याने तिला नदीत ढकलून दिले असा राजेश कुमारचा आरोप आहे. संतदास दुर्गा दास असे तांत्रिकाचे नाव आहे. पत्नीला मारल्यानंतर मानपाल आणि तांत्रिक दोघेही शेजारच्या बदायू जिल्ह्यात पळून गेले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.