InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

आंदोलनामुळे महाराष्ट्राचे नाव बदनाम होत चाललंय : राणे

- Advertisement -

मराठा आरक्षणाचा निर्णय तीन महिन्यात लागणार असेल तर आपण थांबायला हवं. आंदोलनामुळे महाराष्ट्राचे नाव बदनाम होत चाललंय.मराठा आरक्षणाचं आंदोलन थांबावायला हवं, असं आवाहन माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणेंनी केलंय. झी २४ तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीत हे आवाहन केलं आहे.

दरम्यान,मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरु असलेल्या आंदोलनाने काल उग्र रूप धारण केल्याचं पहायला मिळालं. राजगुरूनगर आणि चाकणमध्ये तर आंदोलनाचा भडका उडाला होता. काल झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या चाकणचे पोलीस निरीक्षक चौधरींचा कार्यभार आता तळेगावचे पोलीस निरीक्षकांकडे सोपवण्यात आलाय. काल उसळलेल्या हिंसाचारात पोलीस कॉन्स्टेबल अजय भापकर गंभीर जखमी झाले होते.त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलीस उपअधीक्षक गणपतराव माडगुळकर, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे हे देखील कालच्या हिंसाचारात जखमी आहेत.

- Advertisement -

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभर मोठा वणवा पेटला असून अनेक ठिकाणी हिसाचार होताना पहायला मिळतंय. काही आंदोलकांनी तर आत्महत्या देखील केल्याने मराठा तरुणांच्या रोषाचा भडका उडाला आहे या पाश्वभूमीवर मराठा समाजाला शांत करण्याची गरज असल्याचं शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केले यांनी म्हटलं आहे. मराठा तरुणांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

‘पॉवर’- शिवेंद्रराजेंच्या गाडीत उदयनराजे बसले! शिवेंद्रराजेंनी सारथ्य केलं

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.