InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

बीडमध्ये शेतकऱ्यावर दुष्कळाचे सावट

पावसाळा सुरू होऊन महिना झाला तरी बीडमध्ये पावसाचे आगमन झाले नाही. यामुळे मोठया आशेने शेतकऱ्याने लावलेल्या कपाशी माना टाकू लागल्या आहेत. यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. पिण्यासाठी पाणी नाही, हाताला काम नाही , चारा छावण्या बंद , पाऊस नसल्याने नवा चारा नाही अशा परिस्थितीत पशुधन कसे जगवावे , याही वर्षात शेतीत काही पिकले नाही तर काय खावे ? कसे जगावे ? या चिंतेत शेतकरी आहेत.

पिण्याच्या पाण्यासाठी टँकर वरच मदार आहे, कामासाठी स्थलांतर केलेले मजूर शेतीच्या कामासाठी गावाकडे परतले आहेत. मात्र गावाकडे केवळ अंधार आणि अंधारच आहे, हजारो हेक्टर वरील कापसाची दुबार लागवडीचे संकट उभे राहिले आहे, पावसाचे कोणतेच लक्षण दिसत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply