कोरोनाच्या काळात बँकेचा शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीसाठी तगादा

सध्या राज्यावर सध्या कोरोनाचे मोठे संकट आले आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढताना दिसत आहे.कोरोनामुळे बाजारपेठा  बंद असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या शेती मालाला उठाव नाही.

मुख्यमंत्र्यांनी बांगड्यांचं दुकान उघडलं पाहिजे- निलेश राणे

आधीच अवकळी पाऊस आणि इतर अस्मानी संकटाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्याला आता कोरोना सारख्या एका नवीन संकटाला तोंड द्यावे लागत आहे. शेतीसाठी बँकेकडून शेतकरी कर्ज घेतात मात्र आता कोरोनाच्या संकटामध्ये या बँक प्रशासनाकडून शेतकऱ्यांना कर्ज फेडीसाठी वारंवार फोन येऊ लागले आहेत.

Loading...

कर्जमाफीमुळे 95 टक्के शेतकऱ्यांचा फायदा, आमदार रोहित पवार यांचे वक्तव्य

आधीच खरीप पीकांना उठाव नाही , बाजारात शेतमालाला योग्य भाव नाही.कोरोनामुळे बाजरपेठ बंद आहे असे असताना आता बँकेकडून या शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करण्यासाठी तगादा लावला जात आहे. एकीकडे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवली जात असताना दुसरीकडे मात्र कोरोनाच्या या संकटामध्ये बँकाकडून शेतकऱ्यांना असा त्रास दिला जात आहे. लवकरच राज्य सरकारने यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना या त्रासातून मुक्त करावे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.