InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

त्याआधी ‘हिंदू दहशतवाद’ या शब्दाबद्दल सुशीलकुमार शिंदेंनी जनतेची माफी मागावी – विनोद तावडे

राजकारणात निवृत्त होण्यापूर्वी हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग केल्याप्रकरणी सुशीलकुमार शिंदे यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे अशी मागणी भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी केली आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी  आपली ही शेवटची निवडणुक असल्याचे सांगितले होते. यावर बोलताना विनोद तावडेंनी हे विधान केले आहे. 

तसेच सुशीलकुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रीय गृहमंत्री होते, कॉंग्रेस परिवाराच्या जवळ होते मग जे तुम्ही सोलापूरचे प्रश्न आज मांडत आहेत ते आतापर्यंत तुम्ही का सोडवू शकला नाहीत असा सवालही यांनी केला आहे.  विनोद तावडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.