“चिकन, मटण, माशांपेक्षा गोमांस खा”; भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचा सल्ला

मेघालय : भाजप नेते गोमांस खाण्यास विरोध करताना दिसतात. मात्र, मेघालय सरकारमधील गेल्या आठवड्यात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते मंत्री सानबोर शुलाई यांनी राज्यातील लोकांना चिकन, मटण आणि माशांपेक्षा अधिक गोमांस खा, असं म्हंटल आहे, असं त्यांनी शुक्रवारी पत्रकारांसोबत बोलताना सांगितले.

“मी लोकांना चिकन, मटण किंवा माशांपेक्षा जास्त गोमांस खाण्यास प्रोत्साहित करतो. लोकशाही देशात प्रत्येकाला जे हवे ते खाण्यास मोकळीक आहे. ज्याला जे मनात येईल ते तो खाऊ शकतो. लोकांना अधिक गोमांस खाण्यास प्रोत्साहन दिल्यास भाजपा गोहत्येवर बंदी घालत आहे हा गैरसमज दूर होईल,” असेही ते म्हणाले.

तसेच, पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय मंत्री शुलाई यांनीही आश्वासन दिले की, ते आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांच्याशी बोलतील जेणेकरून मेघालयातील गुरांच्या वाहतुकीवर शेजारच्या राज्यातील गायींच्या नवीन कायद्याचा परिणाम होणार नाही.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा