“बिडीची जेवढी किंमत महाराष्ट्रात आहे तेवढी सुद्धा ईडीची राहिली नाही”

मुंबई : भाजपाकडून महाविकास आघाडीतील नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून टार्गेट करण्यात येत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याच मुद्द्यावरून भाजपाला खडेबोल सुनावले होते. राऊतांपाठोपाठ शिवसेना नेते भास्कर जाधव यांनीही भाजपाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. भाजपाला सर्वच मंत्र्यांनी प्रत्युत्तर देण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले होते.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी देखील आता बस्स झाले. ईडीच्या विरोधात उठाव करावाच लागेल असे वक्तव्य केलं होत. यानंतर महाविकासाआघाडीतील सर्व नेते या विरोधात आक्रमक भूमिका मांडत आहेत. अशातच आता काँग्रेस नेत्या आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी ईडी कारवाईवरून ईडी म्हणजे पान तंबाखुचं दुकान झालंय, असं वक्तव्य केलं होत.

यानंतर आता देगलूर पोटसभा निवडणूकप्रचारादरम्यान, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. बिडीची जेवढी किंमत महाराष्ट्रात आहे तेवढी सुद्धा ईडीची राहिली नाही, या शब्दात धनंजय मुंडे यांनी ईडीच्या कारवाईवर टीका केली आहे. केंद्रात बसलेल्या मोदी सरकारच्या कानापर्यंत आपल्या महाविकास आघाडीचा आवाज जायला हवा, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

दरम्यान, देगलूर-बिलोलीची विधानसभा निवडणूक ही आपल्या अस्मितेची असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले आहेत. या निवडणूकीत विजय मिळवून आपल्याला महाविकास आघाडीची ताकद दिल्लीला दाखवून द्यायची आहे, अशी गर्जना यावेळी धनंजय मुंडे यांनी देगलूर येथील प्रचारसभेत बोलताना केली आहे. भाजप आणि महाविकास आघाडी दोन्हीकडील नेते एकमेकांवर जहरी टीका करत आहेत.

हत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा