२०० कोटींच्या वसुली प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेहीला ईडीचे समन्स

दिल्ली : काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिची २०० कोटी रुपयांच्या वसुलीचे रॅकेट चालवल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीला ईडीने आज चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

ईडीने काही दिवसांपूर्वीच मनी लाँडरिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा जबाब नोंदवला होता. जॅकलीन फर्नांडिसची दिल्लीत चार तास चौकशी केल्यानंतर, तिचे निवेदन मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) साक्षीदार म्हणून रेकॉर्ड करण्यात आले. ज्यामध्ये सुकेश चंद्रशेखर, २०० कोटींपेक्षा जास्त फसवणूक आणि खंडणीचा आरोपी आहे. आता अभिनेत्रीची पुन्हा चौकशी केली जाईल.

त्यानंतर या प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पुन्हा बोलावण्यात आले आहे. सुकेश चंद्रशेखर आणि त्याची कथित पत्नी अभिनेत्री लीना पाल तिहार कारागृहातून २०० कोटी रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणात तुरुंगात आहेत. सुकेशने नोरा फतेहीलाही आपल्या जाळ्यात अडकवण्याचा कट रचला होता. यामुळे आता नोरा फतेहीचीही चौकशी ईडीकडून केली जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा