InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Category

Education

सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षणाचे नाशिक येथे आयोजन

मुंबई, दि. 11 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी उमेदवारांनाService Selection Board (एसएसबी) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतींसाठी दि. 21 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत एसएसबी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी…
Read More...

भिलारमधील जत्रेमुळे १३ ते १५ फेब्रुवारी पुस्तकांचं गाव प्रकल्प तात्पुरता बंद

मुंबई, दि. ११ : पुस्तकांचं गाव, भिलार येथे गावची जत्रा असल्याने, दिनांक १३ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत पुस्तकांचं गाव हा प्रकल्प तात्पुरता बंद राहणार आहे, अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालकांनी आज दिली.या काळात भिलार गावात अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. मूळ गाव भिलार असलेले देशभरातील भिलारवासीय जत्रेच्या निमित्ताने गावास भेट देणार आहेत. त्यामुळे गावातील घरे (वाचनालये) पर्यटकांना आणि शालेय व महाविद्यालयीन सहलींना वाचनाची व पर्यटनाची सेवा देऊ शकणार नाहीत.या…
Read More...

Budget 2019 – घोषणा केल्या पण पैसा कुठंय ? मोदी सरकारचं फसवे आर्थिक ‘बजेट’

केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी या अंतरिम अर्थसंकल्पातून शेतकरी, कामगार, नोकरदार, मध्यमवर्गीयांसाठी अनेक घोषणांचा पाऊस पाडून एकप्रकारे निवडणुकीसाठी मतांची पेरणीच केली आहे. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य नोकरदार, शेतकरी आणि कामगार वर्गाला खुश करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे.अर्थसंकल्पातून शेतकरी, कामगार, नोकरदार आणि मध्यमवर्गीयांसाठी अनेक घोषणांचा पाऊस पाडून पाडला आहे. मात्र, या बजेटमधील घोषणांसाठी सरकार पैसा कुठून आणणार असा प्रश्न अर्थतज्ज्ञ शंकर अय्यर यांनी विचारला आहे. कारण, या…
Read More...

नोटाबंदीमुळेच बेरोजगारीत वाढ; हा घ्या पुरावा

मोदी सरकारने 2016 मध्ये नोटाबंदीची घोषणा केली होती. नोटाबंदी नंतर रोजगार संदर्भात राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेने एक सर्वे केला आहे. त्यात त्यांनी देशातील बेरोजगारीचा दर हा 1972-73 नंतरचा सर्वाधिक असल्याचे सांगितले आहे. अहवालात देशातील 2017-18 मधील बेरोजगारीचा दर 6.1 टक्क्यांवर पोहचला असल्याचं म्हंटले आहे. तर आघाडी सरकारच्या कार्यकाळात 2011-12 मध्ये बेरोजगारीचा दर 2.2 टक्के इतका होता.या सर्व्हेसाठी जुलै 2017 ते जून 2018 या काळात माहिती गोळा करण्यात आली होती. देशातील बेरोजगारीचा दर हा 45…
Read More...

महाविद्यालये बेरोजगारांची निर्मिती करणारे कारखाने : तावडे

महाविद्यालये ही केवळ उच्च शिक्षण देऊन बेरोजगारांची निर्मिती करणारी कारखाने झाली आहेत. देशात मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ निर्माण होणे गरजेचे आहे. मात्र, आपण पारंपरिक शिक्षणात अडकून पडलो आहोत. असे मत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले. ‘महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट आॅफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅन्ड केटरिंग टेक्नॉलॉजी’च्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी तावडे बोलत होते.नागरिकांनी आपल्या मानसिकतेत बदल करून कौशल्य विकासाला हातभार लावला पाहिजे, असे मत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त…
Read More...

मंत्रिमंडळ बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या तीन निर्णयाला मान्यता

रुसाच्या माध्यमातून मुंबईमध्ये डॉ.होमी जहांगीर भाभा विद्यापीठ स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज मान्यता देण्यात आली. डॉ.होमी भाभा विद्यापीठ मध्ये शासकीय विज्ञान संस्था, मुंबई (इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) हे मुख्य महाविद्यालय व सिडनहॅम कॉलेज, एलफिस्टन कॉलेज व शासकीय अध्यापक महाविद्यालय (बी.एड.कॉलेज) या तीन महाविद्यालयांचा डॉ.होमी भाभा विद्यापीठामध्ये समावेश असेल. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील तरतुदीनुसार राज्यातील शासकीय विद्यापीठासाठी विद्या शाखा अधिष्ठाता…
Read More...

हवेतील कार्बन डाय ऑक्साईडमुळे वातावरणात बदल – रामदास कदम

हवेत कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने वातावरणात बदल होत असून त्याचा परिणाम मानवी जीवनावर होताना दिसतो. तसेच प्लास्टिक बंदीला चांगला प्रतिसाद मिळत असून लवकरच 35 लाख कापडी पिशव्या बाजारात येतील. त्याचबरोबर 25 नद्यांचे संवर्धन करण्यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज सांगितले.कदम म्हणाले, हवामान बदलामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. भूकंप, महापूर, त्सुनामी, ओला-सुका दुष्काळ, तीव्र उष्णतेचा उन्हाळा, प्रचंड थंडीचा हिवाळा, नापिकी…
Read More...

स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या योजनांचा मंत्रिमंडळ उपसमितीकडून आढावा

स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांचा आज मराठा आरक्षणासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये आढावा घेण्यात आला. महामंडळाने मराठा समाजासाठी नव्या योजना सुरू करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. मराठा आरक्षणाच्या मागण्यांसंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज समितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात  झाली. यावेळी समितीचे सदस्य तथा सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे,जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री सुभाष…
Read More...

मंत्रिमंडळ निर्णय : दिनांक : ११ डिसेंबर २०१८

शासकीय रुग्णालयात  जन्मणाऱ्या नवजात बालकांना बेबी केअर कीट राज्यातील बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच शासकीय रुग्णालयात जन्मणाऱ्या बालकांना बेबी केअर कीट उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या योजनेचा लाभ पहिल्या प्रसूतीसाठीच मिळणार आहे. बालमृत्यू रोखण्यासाठी विविध विकसित देश अनेकविध उपाययोजना करीत असतात. त्यामध्ये बेबी केअर कीट पुरविण्यास ते प्राथम्य…
Read More...

एमपीएससी’ची जाहिरात, मराठा समाजासाठी पहिल्यांदाच राखीव जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) 342 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पहिल्यांदाच मराठा समाजासाठी सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच मराठा समाजासाठी 16 टक्के आरक्षण जाहीर केले होते. त्यामुळे सरकारने नुकतीच मेगाभरती जाहीर केली आहे.या मेगाभरतीत मराठा समाजासाठी जागा राखीव ठेवण्यात येतील, हे सरकारने यापूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार आता जाहीर झालेल्या एमपीएससी जाहिरातीमध्ये मराठा समाजासाठी जागा राखीव ठेवल्या…
Read More...