InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

राज्यात शासनाचे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रयत्न सुरू

- Advertisement -

पुण्यातील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरॉलॉजीची (आयआयटीएम) दोन विमाने आणि कर्नाटक शासनाची दोन विमाने अशी चार विमाने सोलापुरात दाखल झाली. कृत्रिम पाऊस पाडून बळीराजाला सुखावण्यासाठी हे प्रयत्न शासनाकडून केले जात आहे. या विमानाने आकाशात ढगाळ वातावरण पाहून आकाशात झेप घेतली. यावेळी विमानाने ढगांची चाचपणी केली. सोलापुरातील 200 किलोमीटर परिसरात या विमानाने घिरट्या घातल्या. यावेळी कृत्रिम पावसासाठी वातावरण अनुकूल आहे का याची चाचपणी येत आहे. वातावरण अनुकूल असेल तरच कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

पावसाळा सुरू असला आणि राज्यात पाऊस कोसळत असला तरीही काही भागांमध्ये अद्यापही पुरेसा पाऊस बरसलेला नाही. यामुळे बळीराजावर असणारे दुष्काळाचे संकट दूर करता यावे यासाठी शासन प्रयत्न करत आहे. शासनाने आता कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी आता ढगाळ वातावरणाची चाचणी सुरू आहे. विमानांनी ढगांचे दोन तास परिक्षण केले. तांत्रिककारणांमुळे एकाच विमानाने उड्डाण केले. हे वमान ढगांच्या आद्रतेचा अंदाज घेऊन परतले. आता अनुकूल ढग निर्मिती झाल्यावरच विमानाचे उड्डाण होणार आहे.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.