Eknath Khadase | “…तो मर्द कसला”, शहाजी पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन एकनाथ खडसेंची टोलेबाजी

Eknath Khadase | मुंबई : राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळतं आहे. शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील यांनी काही दिवसांपूर्वी “आपल्या बायकोला साडी घ्यायलाही पैसे नव्हते”असं विधान केलं होतं. त्यावर अनेक चर्चांना उधाण आलं. अशातच यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते एकनाख खडसे (Eknath Khadase) यांनी शहाजी पाटील (Shahaji Patil) यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले एकनाथ खडसे (Eknath Khadase)

आपल्या बायकोला साडी घेऊ शकत नाही तो मर्द कसला, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी शहाजी पाटील यांच्यावर चांगलाच हल्ला केला आहे. एकनाथ खडसे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते असंही म्हणाले,  त्यांनी (शहाजी पाटील) हे कोणत्या हेतूनं म्हटलं मला माहित नाही. हे विधान त्यांनी कदाचित गंमतीनं किंवा उद्वेगानं केलं असेल. आता त्यांना पैशांसाठी कुणाकडे आशेने बघण्याची आवश्यकता भासल्याचे दिसत नाही.

दरम्यान, ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल’ हा डायलॉग प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक ठिकाणी शहाजी बापू पाटील यांना भाषण करण्यासाठी बोलवण्यात आलं. त्यावेळी अनेक मुलाखतीही घेण्यात आल्या होत्या. “खूप गरीबीत राहत आहे. किती दिवस झाले, बायकोला साडीही घेऊ शकलो नाही”, असं वक्तव्य एका मुलाखतीदरम्यान पाटील यांनी केलं होतं. शहाजी पाटील यांच्या या वक्तव्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून चांगलाच समाचार घेण्यात आला होता. शहाजी बापू पाटलांना राष्ट्रवादी महिला काँग्रेस आघाडीकडून साडीदेखील पाठवण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.